Wednesday, 11 January 2017

Love you Dhoni


*धोनी तू कधी स्वता:साठी असं काहीच मागितलं नाहीस..!!*


कपिल देवला सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम करायचा होता म्हणून सहकारी गोलदांजाकडून बाॅल हिसकवताना पाहिलं. सौरव गांगुलीला वर्चस्वाच्या लढाईत भांडताना व शेवटी टीमवापसीसाठी भांडताना पाहिलं. सचिनला शंभर शतके करता यावीत म्हणून मॅनेजमेंटने सर्वाना धारेवर धरताना पाहिलं. परंतु, धोनी तू कधी स्वतासाठी असं काहीच मागितलं नाहीस. कधी डिमांड नाही की हेकेखोरी नाही. तसं बघायला गेल तर तुझ्यासाठी कोणी काही खास केलं नाही. तुझ्यासाठी कोणी बाजू घेतलेलं पाहिलं नाही. तरीसुध्दा तू तुझं वैयक्तिक बॅटिंग करियर कर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी आणि आम्हा भारतीयांना 'वर्ल्डकप' मिळवून देण्यासाठी त्यागलसं.

तू देशहिताला प्रथम प्राधान्य देऊन जगज्जेता संघ बांधलास. त्याला योग्य आकार देऊन जग जिंकलसं. तुझ्यातला स्फोटक फलंदाज हा रिचर्डस् आणि ख्रिस गेल पेक्षाही घातक होता. तू स्वतासाठी खेळला असतास तर आज तुझे ही कित्येक शतके, कितीतरी मॅन आॅफ द मॅच, कितीतरी रेकाॅर्ड्स असते. ऐन फाॅर्मात असताना तू कॅप्टन झालास आणि एक कर्णधार, एक यष्टीरक्षक आणि संकटकाळातील भरवशाचा फलंदाज म्हणून कितीतरी जबाबदाऱ्या पार पाडल्यास. एवढं करुनही तुझ्यात ती उपकार केल्याची किंवा अहंभावाची कुठलीही छटा नाही की विजयाचा उन्माद नाही की दु:खाचा शोक नाही.

मला वाटते की तू खऱ्या अर्थाने निर्वाण मिळवले आहेस. तू या सुख-दु:खाच्या फेऱ्यातून मुक्त झाला आहेस. तू स्वता म्हणाला होतास की नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे मित्र नसावेत. कारण नेतृत्व करताना कर्तव्यापासून दूर जाण्याची चूक होऊ शकते. परंतु, तू घेतलेला प्रत्येक निर्णय काळाने योग्य ठरवलेला आहे. तुझ्यावर गर्व आहे. तुझा अभिमान आहे. जाताजाता ही एक गोष्ट शिकवून गेलासं ती अशी... हरल्यानंतर आपल्याला थांबावं लागणार हे माहित असतं. परंतु, जिंकल्यानंतर कुठे थांबायचं हे कुणाला माहित नसतं. तू आम्हाला शिकवलसं की जिंकल्यानंतर कुठे थांबायचं.'

No comments:

Post a Comment